भारतात 2022 पर्यंत रोज 775.5 टन वैद्यकीय कचरा तयार होणार

विल्हेवाट लावण्याची समस्या बनतेय गंभीर
नवी दिल्ली – भारतात सन 2022 सालापर्यंत रोज 775.5 टन इतका वैद्यकीय कचरा तयार होणार असून त्याची विल्हेवाट कशी लावायची ही एक मोठी समस्या निर्माण होणार आहे असे असोचामच्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. सध्या भारतात वैद्यकीय कचरा तयार होण्याचे प्रमाण 550.9 टन इतके आहे.

या बायोमेडिकल वेस्ट म्हणजेच वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट आणि त्याविषयीच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याची गरज असून त्या विषयीच्या उपाययोजनाही अधिक कडक करण्याची गरज आहे असे या अहवालात म्हटले आहे. दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. किर्ती भूषण यांनी हा अहवाल सादर केला. ते म्हणाले की यासंबंधात केवळ कायदेशीर तरतूदी करून भागणार नाही तर त्याविषयीच्या सामाजिक जागृतीचीही मोठी गरज आहे.

वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ज्या अडचणी येत आहेत त्या मध्ये प्रामुख्याने त्याविषयीची इच्छा, जनजागृती, आणि त्यावर येणारा खर्च या समस्यांचा समावेश आहे. ते म्हणाले की सन 2025 पर्यंत कचरा व्यवस्थापनाचे मार्केट 13.62 अब्ज डॉलर्स पर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. त्यात वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाचाही समावेश आहे. या कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रीय व योग्य पद्धतीने लावण्याची गरज असून त्यासाठी संबंधीत कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. अन्यथा देशात ही एक मोठी समस्या उदभवू शकते असा इशाराही त्यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)