भारतात १५-१८ वयोगटातील २.३ कोटी मुले करतात मजुरी

नवी दिल्ली : भारतात १५ ते १८ वर्षे वयोगटातील २.३ कोटी मुले मोलमजुरी करतात. त्यातील १.९ कोटी मुलांनी शालेय शिक्षण अर्धवट सोडून दिले आहे, असे चाइल्ड राइट्स अँड यू (क्राय) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
२४ लाख मुली बालवयात बनल्या माता भारतामध्ये १५ ते १९ वर्षे वयोगटातील ९२ लाख मुलामुलींचे विवाह झाले असून त्यातील २४ लाख मुली या माता बनल्या आहेत, असे नमूद केलेला हा अहवाल खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधी तसेच महत्त्वाचे अधिकारी, बालकल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना यांच्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे.

शिक्षणात लिंगभेद पाळू नका या अहवालामध्ये म्हटले आहे की, १५ ते १८ वर्षे वयातील मुलांना अपायकारक उद्योग नसलेल्या ठिकाणी काम करण्याची मुभा बालमजूर प्रतिबंध व नियंत्रण कायद्याने दिली आहे. त्याचा लाभ २.३ कोटी मुलांना मिळत आहे. मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याच्या हक्काच्या मसुद्यात दुरुस्ती व्हायला हवी. शालेय
शिक्षण पद्धतीत लिंगभेद पाळला जाणार नाही याकडे विशेष लक्ष पुरविले पाहिजे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुलांना मोफत माध्यमिक शिक्षण द्यायला हवे.

बलात्कार झालेल्या मुलींपैैकी २५ टक्के मुली १५ ते १८ वर्षे वयोगटातील होत्या. बालकांवर होणारे अत्याचारही वाढत आहेत. त्यासाठी बेकारी व गरिबी या दोन समस्यांवर तोडगा काढावा लागेल, असे अहवालात म्हटले आहे. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष स्तुती काकेर म्हणाल्या की, या मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी सामुदायिक प्रयत्न आवश्यक आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)