भारतात व्यापक फेरबदल होत आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी  

येत्या दशकात भारत जगाच्या आर्थिक विकासाचे इंजिन होणार – मोदींचा विश्‍वास 

टोकिओ: भारतात सध्या व्यापक फेरबदल होत असून येत्या दशकभरात भारत हा जगाचे आर्थिक इंजिन होईल असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. जपान मध्ये राहणाऱ्या भारतीयांनी नवीन भारताच्या उभारणीत योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. जपानमधील भारतीय नागरीकांच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी बोलताना ते म्हणाले की भारत वेगाने विकसित होत असून साऱ्या जगाने भारताने मानवतेसाठी दिलेल्या सेवेबद्दल भारताचे कौतुक केले आहे असे त्यांनी नमूद केले. लोककल्याणासाठी भारतात जे प्रयत्न सुरू आहेत त्याचाही जगात सन्मान होत आहे असे ते म्हणाले. भारताने जनधन योजना, मोबाईल आणि आधारच्या आधारे जे डिजीटल व्यवहाराचे मॉडेल स्वीकारले आहे त्याचेही साऱ्या जगात कौतुक झाले आहे. भारतातील प्रत्येक खेड्यापाड्यात ब्रॉडबॅंन्ड कनेक्‍टीव्हीटी पुरवली जात आहे. देशात सुमारे शंभर कोटी मोबाईल कनेक्‍शन्स देण्यात आली असून तेथे इंटरनेटचा 1 जीबीचा डाटा कोल्ड ड्रिंक पेक्षाही स्वस्तात पुरवला जात आहे.

लोकांना सेवा देण्यासाठी डाटा हा महत्वाचा स्त्रोत ठरत आहे. आम्हीं भारतात दर्जेदार उत्पादने तयार करीत असून ही उत्पादने केवळ भारतासाठी नव्हे तर साऱ्या जगासाठी उत्पादित केली जात आहेत असे ते म्हणाले. इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि ऑटोमोबॉईल क्षेत्रातील उत्पादनांचा त्यांनी या अनुषंगाने उल्लेख केला. कमी किंमतीच्या उत्पादनाचे नियोजन भारत करीत आहे असे नमूद करताना त्यांनी भारतातर्फे जे अंतरीक्ष कार्यक्रम राबवले जात आहेत त्याचाही उल्लेख केला. गेल्या वर्षी आमच्या शास्त्रज्ञांनी एकाचवेळी शंभर उपग्रह अवकाशात सोडून या क्षेत्रात एक विक्रम नोंदवला. भारताने सन 2022 पर्यंत गगनयान अंतरीक्षात सोडण्याचेही नियोजन केले आहे असे त्यांनी नमूद केले. भारतात सुरू असलेल्या या विकासकामांमुळेच भारत हा आता जगात वेगाने आर्थिक विकास करणारा देश बनला आहे असे त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)