भारतात लवकरच येणार ‘ही’ महागडी स्कूटर

मुंबई :  स्कोमादी ही ब्रिटीश कंपनी लवकरच भारतात पाऊल ठेवणार आहे. आपली टू-व्हीलर स्कूटी स्कोमादी भारतात लाँच करणार आहे. ही कंपनी लम्ब्रेटा जीपी स्टाईल मॉडल बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्रातील एका डीलरसोबत कंपनीने करार केला असून कंपनी त्यांच्यासोबत स्कूटीची विक्री करणार आहे. सध्या भारतात टीटी १२५ स्कूटीची विक्री केली जाणार आहे. जगातील सर्वात महागडी स्कूटर असल्याचे कंपनीने म्हटले आहे. २ लाख रुपये एवढी या स्कूटरची किंमत आहे.

वर्षाभरापूर्वी येणाऱ्या लेम्ब्रेटा स्कूटी सारखे स्कूटीचे डिझाईन आहे. मॉडर्न लूकसह एलईडी हेडलाईट आणि टेललाईट स्कूटीला देण्यात आले आहेत. डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. यामध्ये १२ इंचाची अॅलॉय व्हीलसोबतच ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. १०० किलो वजनाच्या या स्कूटीमध्ये ११ लिटरची पेट्रोलची टाकी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)