भारतात मुबलक खनिज संपत्ती 

खनिजे आणि धातू क्षेत्रांत गुंतवणूक करण्याचे आवाहन 
नवी दिल्ली: केंद्रीय पोलादमंत्री चौधरी बिरेंदर सिंग यांनी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांना भारतातील खनिजे आणि धातू क्षेत्रांत गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. नवी दिल्लीत खनिज आणि धातू यावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. भारताच्या खनिज क्षेत्रात अफाट क्षमता असून गुंतवणूकदारांना खाणींचा शोध घेण्यासाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत, असे ते म्हणाले. भारताला खनिजांची देणगी लाभली असून 95 खनिजांची निर्मिती भारतात होते, असे ते म्हणाले.
पोलाद मंत्रालयाचे सचिव बिनॉय कुमार यांनी या उद्‌घाटन समारंभाचे अध्यक्षपद भूषविले. ते म्हणाले की, भारत हा जगातला दुसरा सगळ्यात मोठा कच्च्या पोलादाचा उत्पादक आहे. तर तिसरा सर्वात मोठा पोलाद उत्पादक आहे.
चालू वर्षात पोलादाचा दरडोई वापर 69 किलो असून तो आंतरराष्ट्रीय मानकापेक्षा बराच कमी आहे, असे ते म्हणाले. म्हणूनच पोलाद उद्योगात भविष्यात मोठ्या संधी आहेत. 2030 पर्यंत 300 दशलक्ष टन पोलाद निर्मितीचे उद्दिष्ट राष्ट्रीय पोलाद धोरण 2017 मध्ये निश्‍चित करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. 16 देशांमधील 500 हून अधिक प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)