भारतात मागील वर्षी 109 प्रकरणांत फाशीची शिक्षा

ऍम्नेस्टी इंटरनॅशनलची माहिती
संयुक्त राष्ट्रे – भारतात मागील वर्षी (2017) विविध न्यायालयांनी 109 प्रकरणांत फाशीची शिक्षा ठोठावली. हे प्रमाण आधीच्या वर्षाच्या तुलनेत सुमारे 20 टक्‍क्‍यांनी कमी आहे. भारतात 2016 मध्ये 136 प्रकरणांत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

मानवी हक्कांवर देखरेख ठेवणारी जागतिक पातळीवरील संस्था असणाऱ्या ऍम्नेस्टी इंटरनॅशनलने 2017 मधील फाशीची शिक्षा आणि अंमलबजावणीवरील अहवाल गुरूवारी प्रसिद्ध केला. त्यामध्ये भारताबरोबरच विविध देशांत ठोठावण्यात आलेल्या मृत्यूदंडाबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार भारतात मागील वर्षी शंभरहून अधिक प्रकरणांत फाशीची शिक्षा ठोठावली गेली असली तरी एकाही शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली नाही. मागील वर्षाच्या अखेरपर्यंत भारतात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्यांची संख्या 371 इतकी होती. भारत, सिंगापूर आणि थायलंड या देशांनी आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरोधात जात मृत्यूदंडाची व्याप्ती वाढवली. त्यासाठी नवे कायदे करण्यात आले. संबंधित देशांमध्ये अनुक्रमे अपहरण, आण्विक दहशतवाद आणि भ्रष्टाचाराबद्दल मृत्यूदंडाची तरतूद करण्यात आली, असे ऍम्नेस्टीने म्हटले आहे.

-Ads-

ऍम्नेस्टीच्या अहवालानुसार, मागील वर्षी 53 देशांत 2 हजार 591 प्रकरणांत मृत्यूदंड ठोठावण्यात आला. आधीच्या वर्षी (2016) ते प्रमाण 3 हजार 117 इतके उच्चांकी होते. 23 देशांमध्ये 2016 यावर्षी 1 हजार 32 प्रकरणांत मृत्यूदंडाची अंमलबजावणी करण्यात आली. मागील वर्षी त्यामध्ये 4 टक्‍क्‍यांनी घट होऊन 993 प्रकरणांत मृत्यूदंडाची अंमलबजावणी झाली. ऍम्नेस्टीच्या अहवालात चीनमधील प्रकरणांचा समावेश नाही. त्या देशात संबंधित माहिती गोपनीय ठेवली जाते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)