भारतात पुन्हा मोदींचे सरकार आले नाही तर मोठा फटका बसेल- क्रिस्टोफर वुड

नवी दिल्ली : देशात एकीकडे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष आपली रणनीती ठरवत आहे तर जगाच्या राजकीय पातळीवरही भारताच्या निवडणुकांवर चर्चा होताना दिसत आहे. कारण, देशात पुन्हा एकदा मोदींचे सरकार सत्तेत यावे असे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी CLSA चे मुख्य रणनितीकार क्रिस्टोफर वुड यांची इच्छा आहे. त्यांच्या या मतासाठी त्यांनी काही कारणेदेखील दिले आहेत.

“पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आले नाही, तर भारताला मोठे नुकसान सहन करावे लागेल.”, असे म्हणत वुड्स यांनी म्हटले आहे.  “2018 या वर्षात भारताने काही खास कामगिरी केली नाही, मात्र तरी आशियात भारतच वरचढ आहे. भारताच्या आणखी चांगली कामगिरी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत किती, यावर अवलंबून आहे.” तेलांच्या किंमती वेगाने वाढत आहेत. त्यामुळे भारतासमोरील आव्हाने वाढत आहेत, असेही मत वुड्स यांनी नोंदवले आहे.
भारतीय स्टॉक मार्केटकडूनही वुड्स यांना अजूनही आशा आहेत.

क्रिस्टोफर वुड्स हे CLSA या ब्रोकिंग फर्मचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य रणनितीकार आहेत. ‘सर्वोत्कृष्ट रणनितीकार’ म्हणून जागतिक स्तरावर त्यांना ओळखले जाते. गुंतवणूकदार नेहमीच आर्थिक क्षेत्रातील त्यांच्या अंदाजांकडे लक्ष ठेवून असतात. ‘ग्रीड अँड फिअर’ नावाचे साप्ताहिक सुद्धा क्रिस्टोफर वुड्स प्रसिद्ध करतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)