भारतात दररोज 56 पादचाऱ्यांचा रस्ता ओलांडताना मृत्यू 

नवी दिल्ली: नुकत्याच प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार भारतात दररोज 56 पादचाऱ्यांचा रस्ता ओलांडताना मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून भारतात रस्ता ओलांडताना होणाऱ्या अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. भारत सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 2014 साली रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 12 हजार 330 होती. 2017 साली हा आकडा वाढून 20 हजार 457 पर्यंत पोहोचला आहे. याची सरासरी काढल्याच दररोज रस्ता ओलांडताना 56 जणांचा मृत्यू होत असल्याचे समोर येते.
भारतात पादचारी हे रस्ता ओलांडत असताना सर्वाधिक असुरक्षित असतात. दुचाकी आणि सायकलस्वारांचाही याच श्रेणीत समावेश होते. अधिकृत आकडेवारीनुसार 2017 मध्ये रस्ते अपघातात दररोज 133 दुचाकीस्वार आणि 10 सायकलस्वार मृत्युमुखी पडले. राज्यवार आकडेवारी पाहिल्यास गतवर्षी रस्ते अपघातामध्ये पादचाऱ्यांचे सर्वाधिक मृत्यू तामिळनाडूमध्ये झाले. तामिळनाडूमध्ये गतवर्षी रस्ते अपघातात 3 हजार 507 जण मृत्युमुखी पडले. त्याखालोखाल महाराष्ट्रामध्ये 1831 जणांचा मृत्यू झाला. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आंध्र प्रदेशमध्ये 1331 पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना प्राण गमवावे लागले होते.
त्याबरोबरच रस्ते अपघातातील दुचाकीस्वारांच्या मृत्युमध्येही तामिळानाडू पहिल्या स्थानावर आहे. तामिळनाडूमध्ये गतवर्षी झालेल्या रस्ते अपघातात सहा हजार 329 दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. तर उत्तर प्रदेशमध्ये पाच हजार 699 आणि महाराष्ट्रात चार हजार 569 दुचाकीस्वारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)