भारतात जीएसटी लवकर स्थिरावला- अरुण जेटली

 आगामी काळात करदात्याची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न होणार

मोठे भौगोलिक क्षेत्रफळ असलेल्या भारतात पूर्णतः नवीन असलेला वस्तू आणि सेवा कर केवळ पाच महिन्यांत स्थिरावला आहे. विविध राज्यांतील व्यापारी आणि कंपन्यांना या कराचा भरणा कसा करायचा आणि विवरण कसे भरायचे या संबंधात माहिती झाल्यामुळे कर संकलनात आता वाढ होऊ लागली आहे. आगामी काळातही हा कर अधिक सुटसुटीत करण्यासाठी प्रयत्न जारी राहतील.

अरुण जेटली, केंद्रीय अर्थ आणि वाणिज्य मंत्री

 

-Ads-

नवी दिल्ली -डिसेंबर महिन्यात जीएसटीचे कर संकलन बऱ्याच प्रमाणात वाढले आहे. त्याचबरोबर ते आगामी काळातही वाढण्याची शक्‍यता आहे. इतर देशापेक्षा भारतात जीएसटी कमी वेळात स्थिरावला आहे. त्याबाबत आपण समाधानी आहेत. तसेच आता करदात्याची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यास तसेच काही प्रमाणात कराच्या दरात फेररचना करण्यासही वाव असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले आहे.

सहा महिन्यातच जीएसटी आता बहुतांश कंपन्या आणि व्यापाऱ्यांना समजला असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापासून कर संकलन वाढले आहे. दरम्यानच्या काळात सरकारला कराचे दर अनेकदा कमी जास्त करावे लागले. तरी सर्व यंत्रणा सुरळीत चालत आहे. सध्या कराचे दर 5 टक्‍के, 12 टक्‍के, 18 टक्‍के आणि 28 टक्‍के या चारच पातळ्यावर आहेत. 28 टक्‍के कर पट्ट्यात केवळ दीर्घ काळ वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि अपायकारक वस्तूचा समावेश केला आहे. त्याचबरोबर रोजच्या वापरातील अनेक वस्तूवर कर नाही.

जीएसटीमुळे भारतात उद्योग सुरु करणे आणि कर भरणा करण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. भारत सध्या उद्योग सुरू करण्यासाठी पुरक वातावरण असलेल्या देशांच्या क्रमवारीत पहिल्या शंभर देशांमध्ये आहे. आता जीएसटी लागू करण्यात आल्यामुळे या क्रमवारीत भारत मोठी झेप घेण्याची शक्‍यता आहे. नजिकच्या काळात या क्रमवारीत भारत पहिल्या 50 देशांत येण्याची शक्‍यता वाढली असल्याचे अरुण जेटली यांनी एका कार्यक्रमात सांगितले. ते म्हणाले की यामुळेच भारतात होणाऱ्या परदेशी गुंतवणूकीत वाढ होत आहे.

डिसेंबर महिन्यात जीएसटीतून होणाऱ्या कर संकलनात वाढ झाली. या महिन्यात 86703 कोटी रुपयाचे कर संकलन झाले. त्या अगोदर दोन महिन्यापासून कर संकलन कमी होत होते. त्यामुळे तूट वाढते की काय अशी भिती निर्माण झाली होती.
ऑक्‍टोबर महिन्यात या करातून 83 हजार कोटी रुपये मिळाले होते तर नोव्हेंबर महिन्यात या करातून सरकारला 80808 कोटी रुपये जमा झाले होते. सप्टेंबर महिन्यात 92150 कोटी रुपये जमा झाले होते. त्यानंतर मात्र दोन महिने कराचे संकलन कमी झाल्यामुळे चिंता निर्माण झाली होती.

आतापर्यंत 1 कोटी करदात्यांनी नोंदणी केली आहे. सरकार या आकडेवारीबाबत समाधानी आहे. आगामी काळातही करदात्यांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. 17.11 लाख इतके करदाते कंपोझिट करदाते आहेत. त्यांना तिमाहीच्या पातळीवर विवरण भरावे लागले.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)