भारतात आर्टफिल्म बनवणे अजूनही अवघडच – कोंकणा सेन

भारतात अजूनही आर्टफिल्म बनवणे अवघडच आहे, असे मत कोंकणा सेनने व्यक्‍त केले आहे. कोंकणाने गेल्या वर्षीच डायरेक्‍शनमध्ये पदार्पण केले आहे. आपण डायरेक्‍ट केलेली पहिलीच फिल्म आर्ट फिल्म होती, हे खूप चांगले झाले. मी एक अभिनेत्री आहे आणि माझे कुटुंबिय या क्षेत्राशीच संबंधित आहेत, म्हणून मला ही फिल्म करता आली. पण तरिही भारतात आर्टफिल्म तयार करणे खूपच अवघड आहे, असे ती म्हणाली.

कोंकणाने डायरेक्‍ट केलेल्या “ए डेथ इन द गंज’ या सिनेमाला तीन फिल्म फेअर ऍवॉर्डस मिळाले आहेत. पहिल्याच सिनेमाला असे ऍवॉर्ड मिळणे म्हणजे निश्‍चितच कौतुकास्पद आहे. अशा सिनेमासाठी आपल्याला नेहमीच काही अस्पर्शित विषय हवे असतात. ज्या विषयांवर अद्याप प्रकाशच पडलेला नाही, किंवा ज्या विषयांमुळे समस्या निर्माण होतात, असेच विषय आपल्याला हाताळायला आवडतील, असे ती म्हणाली. सगळेच जर छान छान, सुंदर असेल तर ते बघणेही किती उबग आणणारे होईल. जर काही नवनिर्मिती करायची असेल, तर नवीन विषयच हवेत. पण भारतात अशा विषयांना हात घालणे खूपच धाडसाचे ठरू शकते, हे देखील तिने स्पष्ट केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)