भारतातील ६.२५ लाख मुले दररोज धूम्रपान करतात-टोबॅको अॅटलास

मुंबई :  भारतात ६.२५ लाख मुले दररोज धूम्रपान करतात, असे टोबॅको अॅटलासने केलेल्या सर्वेक्षणाअंती जाहीर झालेल्या अहवालात समोर आले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे तंबाखू व सिगारेट सर्वत्र सहजपणे व स्वस्त उपलब्ध होत असतात. आपल्या देशात तर सिगारेट सुट्या स्वरुपातही विकल्या जातात.

धूम्रपानामुळे देशाचे १,८१,८६९ कोटी रुपयांचे नुकसान होते. यात आरोग्य सुधारण्यावर झालेला थेट खर्च आणि उत्पादकता कमी झाल्यामुळे होणारा अप्रत्यक्ष खर्च यांचा समावेश आहे. वरील आकडेवारी पाहिल्यास एक गोष्ट स्पष्ट होते, की आपल्या सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत धूम्रपानामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

जगभरात सर्वत्र ३१ मे जागतिक तंबाखूविरोधी दिवस पाळला जात आहे. या दिवशी तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे. जगभरात तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी ७० लाख जणांचा मृत्यू होतो. यातील १० लाख जण विकसनशील देशांतील असतात. भारतात दर सहा सेकंदांनी एकजण तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या रोगांना बळी पडतो. प्रौढांच्या तंबाखूसेवनाविषयीच्या जागतिक सर्वेक्षणानुसार, भारतात तंबाखू सेवनाचे प्रमाण प्रचंड आहे. भारतात २७.५ कोटी प्रौढ व्यक्ती, म्हणजे एकुणात ३५ टक्के लोकसंख्या, तंबाखूचे सेवन कोणत्या तरी प्रकाराने करीत असते. ही संख्या वाढतच चालली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)