भारतातील सॉफ्टवेअर विकसक स्वयंप्रेरीत

बंगळुरू-सॉफ्टवेअर क्षेत्रात विकासकाचे (डेव्हलपर्स) काम करणा-या सुमारे 70 टक्‍के लोकांनी कोड तयार करण्याचे काम शिकण्यास संस्थेवर अवलंबून न राहता यूट्यूब, तसेच गिट-हब आणि स्टॅक ओव्हरफ्लो यांसारख्या कोडिंग वेबसाईटचा आधार घेतल्याची माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 3,700 भारतीय विकासकांपैकी 70 टक्के विकासकांनी कोड कसे तयार करावे हे एक तर पूर्णत: शाळेबाहेर अथवा शाळेसह बाह्य साधनांचा वापर करून शिकल्याचे सांगितले.

33 टक्‍के (1,217 विकासक) जणांनी सांगितले की, ते पूर्णत: स्वयंशिक्षण पद्धतीने ही विद्या शिकले. हॅकररॅंक या कंपनीने जागतिक पातळीवर हे सर्वेक्षण केले. 42 देशांतील 40 हजार विकासकांची मते कंपनीने जाणून घेतली. हॅकररॅंक ही कंपनी तांत्रिक क्षेत्रातील नोकऱ्या उपलब्ध करून देणारा प्लॅटफॉर्म चालविते. चांगले कोडकर्ते मिळावेत यासाठी ऍमेझॉन, लिंकडइन, क्वारा आणि फेसबुक यांसारख्या कंपन्याही या प्लॅटफॉर्मकडे लक्ष देऊन असतात. सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार, स्टॅक ओव्हरफ्लो ही ऑनलाइन कम्युनिटी कोड शिकणा-यांत सर्वाधिक लोकप्रिय आहे.

70 टक्‍के भारतीय विकासक आणि विद्यार्थी या कम्युनिटीचा वापर करतात. त्याखालोखाल यूट्यूबचा बोलबाला आहे. मूक (मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्सेस) श्रेणीतील उदेमी, कोर्सेरा तसेच ऑनलाइन ट्युटोरिअल वेबसाइट्‌स प्लुरलसाइट्‌स आणि लिंडा हे स्रोतही पुस्तकांपेक्षा अधिक लोकप्रिय आहेत. 11 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त भारतीय विद्यार्थी वयाच्या 15 वर्षांपूर्वीच कोडिंग शिकायला सुरुवात करतात. जागतिक पातळीवर तर 31 टक्‍के विद्यार्थी वयाच्या 15 वर्षांपूर्वी कोडिंग शिकू लागतात.

भारतात 71 टक्‍के विद्यार्थी 20 वर्षांचे होण्यापूर्वी कोडिंग शिकतात. विकासकांत प्रचलित असलेल्या प्रोग्रामिंग भाषांत भारतीय परंपरा सर्वाधिक जुनी आहे. प्रोग्रामिंग क्षेत्रातील सर्वांत जुनी सीफ ही भाषा सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 80 टक्के विकासकांना माहीत होती. याशिवाय सी++, जावा आणि जावास्किप्ट या प्रोग्रामिंग भाषाही लोकप्रिय असून, अर्ध्यापेक्षा जास्त भारतीय विकासकांना त्या येतात. 42 टक्‍के भारतीय विकासकांना पायथॉन ही प्रोग्रामिंग भाषाही येते. इतर देशात मात्र हे प्रमाण फारच कमी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)