भारतातील मोठ्या कंपन्यांसमोर तिहेरी संकटाचा धोका 

बॅंकांकडून भांडवल महाग, रुपया घसरला; निर्यात वाढण्याची शक्‍यता झाली कमी
नोटाबंदी आणि जीएसटीमधून कंपन्या सावरत असतानाच भारतातील उद्योगासमोर तिहेरी संकट निर्माण झाले आहे. बॅंकांची परिस्थिती खराब झाल्यामुळे आणि महागाई वाढल्यामुळे व्याजदर वाढले आहे. त्यामुळे भांडवल महागात पडत आहे. रुपया घसरल्यामुळे जागतिक बाजारातूनही भांडवल महाग झाले आहे. त्यातच जागतिक परिस्थिती खराब असल्यामुळे निर्यात वाढण्याची शक्‍यता मंदावली आहे. 
-अरुण सिंह, प्रमुख अर्थतज्ज्ञ, डन अँड ब्रॅंडस्ट्रिट 
नवी दिल्ली: नोटाबंदी आणि जीएसटीच्या परिणामातून अर्थव्यवस्था पुरेशी सावरली नसतानाच उद्योगासमोर तिहेरी संकट निर्माण झाल्यामुळे उत्पादकता घसरण्याचा धोका निर्माण झाला असल्याचा इशारा एका अभ्यास अहवालात देण्यात आला आहे. बॅंका अडचणीत असल्यामुळे आणि व्याजदर जास्त असल्यामुळे उद्येगांना मिळणाऱ्या भांडवलाची किंमत वाढली आहे. रुपया घसरल्यामुळे जागतिक भांडवल बाजारातून भांडवल महागात पडत आहेत. त्याचबरोबर जागतिक अर्थव्यवस्था संभ्रमावस्थेत असल्यामुळे निर्यातीचा आधार मिळण्याची शक्‍यता कमी झाली आहे.
यातून लवकर मार्ग निघण्याची शक्‍यता कमी असल्याचे डन ऍण्ड ब्रॅंडस्ट्रिटच्या अभ्यास अहवालात नमूद करण्यात आले आहे. या संस्थेचे प्रमुख अर्थतज्ज्ञ अरूण सिंह यांनी सांगितले की, या तीनही बाबीवर कोणाचे फारसे नियंत्रण नसल्यामुळे या परिस्थितीतून बाहेर पडण्यास वेळ लागण्याची शक्‍यता आहे. बॅंकांच्या नफ्यात वाढ होण्याऐवजी तोट्यात वाढ होत आहे. त्याचबरोबर महागाई वाढत असल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेनेच व्याजदरात वाढ केल्यामुळे बॅंकांनाही व्याजदरात वाढ करावी लागत आहे. त्याचा परिणाम कंपन्यांच्या भांडवल वापरावर होत आहे. त्याचबरोबर कंपन्यांना भांडवल देतांना बॅंका ताकही फुंकून पिल्यासारखे वागत आहेत.
यातून मार्ग काढण्यासाठी मोठ्या कंपन्या परदेशातून भांडवल जमा करण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र रुपया या वर्षात आतापर्यंतच 9 टक्‍क्‍यानी कोसळल्यामुळे या कंपन्यांना परदेशातून भांडवल मिळविणेही तितकेच महागात पडत आहे. त्याचबरोबर चलनबाजारातील अस्थिरतेमुळे कंपन्यांचा हेजिंगचा खर्चही वाढू लागला आहे. अमेरिकेने अनेक देशाबरोबर व्यापारयुद्ध सुरू केल्यामुळे जागतिक व्यापारावरही परिणाम होत आहे. यामुळे कंपन्यांच्या उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यातल्या त्यात या बाबीचा अंदाज आल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने गेल्या दोन महिन्यापासून सुरू केलेल्या उपाययोजनामुळे महागाई कमी होण्याची शक्‍यता आहे. या वर्षाच्या उरलेल्या काळात किरकोळ महागाईचा दर 3.7 ते 3.9 टक्‍क्‍यांच्या दरम्यान राहण्याची शक्‍यता आहे. रिझर्व्ह बॅंकेला आणि केंद्र सरकारला हा दर 4 टक्‍क्‍याच्या आता हवा आहे. तो त्या पातळीच्या खाली राहण्याची शक्‍यता आहे. तर घाऊक महागाईचा दर 4.8 ते 5 टक्‍क्‍यांच्या दरम्यान राहण्याची शक्‍यता आहे. या आघाडीवर थोडीशी चिंता करण्यासरखी परिस्थिती आहे. मीा आता आगामी काळता ही महागाई कमी करण्यासाठी परिणामकारक प्रयत्न केले जाण्याची शक्‍यता असल्याचे अहवालात म्हटले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)