भारतातील महत्वाच्या संस्था मोदींनी मोडीत काढल्या 

तृणमुल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जींचा आरोप 

कोलकाता – मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने देशातील सीबीआय, आरबीआय या सारख्या सर्व महत्वाच्या संस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न चालवला आहे असा आरोप तृणमुल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा एकदा केला आहे. या विघातक शक्तींपासून देशाला वाचवण्याची गरज आहे असे त्यांनी म्हटले आहे.

आज येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना त्या म्हणाल्या की निवडणुका डोळ्या समोर ठेऊन ते लोक आता पुतळ्यांचे राजकारण करू लागले आहेत पण लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचाच पुतळा झाल्याशिवाय राहणार नाही.

मोदी सरकारच्या विरोधात जंग पुकारण्यासाठी येत्या जानेवारी महिन्यात पक्षातर्फे ब्रिगेड परेड ग्राऊंडवर मोठी रॅली आयोजित करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. देशाला भाजपच्या विघातक राजकारणापासून वाचवण्यासाठी आपला पक्ष मोठी भूमिका बजावेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

ब्रिगेड परेड ग्राऊंड वरील मेळाव्याला देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांना आपण आमंत्रित करणार आहोत. त्यावेळी विरोधी ऐक्‍याचे दर्शन देशाला घडेल आणि त्यातून नवीन राजकारण उदयाला येईल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपने पुढील महिन्यापासून पश्‍चिम बंगालमध्ये रथयात्रा आयोजित केल्या आहेत. यात त्यांचा उद्देश समाजात दुफळी माजवून स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेणे आहे पण आम्ही एकता यात्रा काढून त्यांला प्रत्युत्तर देऊ असे त्या म्हणाल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)