भारतातील भुकेची स्थिती चिंताजनक ; ग्लोबल हंगर इंडेक्‍समध्ये भारत 103 व्या क्रमांकावर 

अन्नाच्या बाबतीत नेपाळ आणि बांगलादेशाची स्थितीही भारतापेक्षा चांगली 

नवी दिल्ली: नागरीकांच्या अन्नाच्या उपलब्धतेनुसार देशांची वर्गवारी करणारी जागतिक भूक निर्देशांक सुचि जारी झाली आहे. यात भारताचे स्थान मागच्यावर्षीच्या तुलनेत आणखी घसरून 103 इतके झाले आहे. ही एकूण 119 देशांची यादी आहे. सन 2014 पासून भारताची ही स्थिती दरवर्षागणिक खालावलेलीच आढळून आली आहे. 2014 साली भारत या यादीत 55 व्या क्रमांकावर होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या यादीनुसार भारताची वर्षागणिकची स्थिती अशी होती. सन 2015 साली भारताचा या यादीतील क्रमांक 80 वा होता. सन 2016 साली हा क्रमांक 97 इतका घसरला, सन 2017 साली भारत 100 व्या स्थानावर गेला होंता. इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्युट मार्फत ही यादी दरवर्षी जाहीर केली जाते. देशातील अन्नाच्या उपलब्धतेचे प्रमाण, लोकांना मिळणारे अन्नाचे प्रमाण, त्याची गुणवत्ता, त्यातून मिळणाऱ्या पोषण मुल्याचे प्रमाण इत्यादी निकषांवर भूक निर्देशांक ठरवला जातो.

या यादीत अफ्रिकेतील मागास समजल्या जाणाऱ्या कांगो, नायगर, टांझानिया, इथोपिया इत्यादी देशांचे स्थानही भारतापेक्षा वरच्या स्थानावर आहे. या सुचिनुसार भारताच्या शेजारी असलेला चीन 25 व्या स्थानावर, श्रीलंका 67 व्या स्थानावर, म्यानमार 68, नेपाळ 72, बांगलादेश 86 आणि मलेशिया 87 व्या स्थानावर आहे. त्यातल्या त्यात भारतासाठी समाधानाची बाब अशी की पाकिस्तानची स्थिती भारतापेक्षा अधिक खालच्या स्थानावर असून त्यांचा क्रमांक 106 इतका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)