भारतातील भाजप सरकार पाक विरोधी – इम्रान खान 

वॉशिंग्टन – भारतात पुढील वर्षी लोकसभा निवडणूका होत आहे. या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनेच तेथील भाजप सरकार मुस्लिमविरोधी आणि पाकिस्तानविरोधी भूमिका घेत आहे, अशी टीका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. तसेच 2019च्या निवडणुकांनंतर सत्ताबदल झाल्यास भारतासोबत संबंध सुधारतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

इम्रान खान यांनी नुकतीच अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्राला मुलाखत दिली. यात त्यांनी भाजपावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. इम्रान खान म्हणाले, भारतामध्ये पुढच्या काही महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. त्यामुळे माझा प्रस्ताव धुडकावला जात आहे. भारतात मुस्लिम विरोधी, पाकिस्तान विरोधी विचारसरणीचा पक्ष सत्तेवर आहे, असे त्यांनी सांगितले.

-Ads-

ही स्थिती निवडणुका झाल्यानंतर सुधारेल. नवीन सरकारसोबत पुन्हा सकारात्मक चर्चा सुरू होईल आणि दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील, असे इम्रान यांनी नमूद केले. भारतातील शीख बांधवांसाठी नुकतेच पाकिस्तानातील कर्तारपूर गुरुद्वाराचे दरवाजे खुले करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
दरम्यान, सत्ताधारी भाजपावर टीका करण्याची इम्रान खान यांची ही पहिली वेळ नाही. सप्टेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्रातील सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानबरोबरची परराष्ट्र मंत्री स्तरावरील चर्चा रद्द केल्यानंतर भारताच्या या निर्णयातून अहंकार दिसतो, अशी टीका त्यांनी केली होती.

26/11च्या सूत्रधारांना शिक्षा होणे पाकच्या हिताचे 
26/11च्या मुंबई हल्ल्याच्या सूत्रधारांना शिक्षा होणे हे पाकिस्तानच्या हिताचे आहे, असे मतही इम्रान खान यांनी या मुलाखतीत व्यक्त केले. मी माझ्या अधिकाऱ्यांना याप्रकरणी जातीने लक्ष घालण्याची सूचना केली असून तातडीने कारवाई करण्यास सांगितले आहे. 26/11 हा एक दहशतवादी हल्ला होता. त्यामुळे त्या हल्ल्याचे सूत्रधार पकडले जाणे आवश्‍यक आहे. जे पाकिस्तानच्या भल्याचे आहे, असेही ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)