भारतातील बौद्ध भिक्षूंवर चीनमध्ये बंदी

पेईचिंग: भारतात दीक्षा घेणाऱ्या तिबेटच्या बौद्ध भिक्षूंच्या प्रवेशावर चीनच्या एका प्रांताने बंदी घातली आहे. हे भिक्षू फुटीरतावादी असून चीनमध्ये फुटीरतावादी विचार पसरवित असल्याने त्यांच्यावर बंदी घालण्यात आल्याचे चीनचे म्हटले आहे.

शिचुआन प्रांतातील लिटयांग काऊंटीमध्ये ही बंदी घालण्यात आली आहे. चीनमधील ‘ग्लोबल टाइम्स’ या वृत्तपत्राने त्याबाबतची माहिती दिली आहे. तिबेटमधून भारतात आलेल्या तरुणांना भारतात बौद्ध भिक्षू बनवले जाते. त्यानंतर त्यांना चुकीच्या पद्धतीने प्रशिक्षित केले जाते. त्यामुळेच या भिक्षुंना लिटयांग काऊंटीमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. दरवर्षी काऊंटीमध्ये देशभक्तीचा क्लास घेतला जातो. त्यात सर्वश्रेष्ठ कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार दिला जातो. या क्लासमधील प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवली जाते. फुटीरतावादी विचारांच्या विद्यार्थ्यांवर खास करून लक्ष ठेवले जाते, असे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)