भारतातील बेरोजगारीचा दर 3.5 टक्‍क्‍यांवर स्थिर

जागतिक कामगार संघटनेचा अहवाल : चीनमधील बेरोजगारीत 0.1 टक्‍क्‍यांनी वाढ
नवी दिल्ली – भारतातील बेरोजगारीचा दर 3.5 टक्‍क्‍यांवर स्थिर राहणार असून चीनमधली बेरोजगारी 4.7 टक्‍क्‍यांवरून वाढून 4.8 टक्के होईल, असा अंदाज जागतिक कामगार संघटनेने व्यक्त केला आहे. भारतातली बेरोजगारी कमी असली तरी एकूण रोजगारापैकी तब्बल 77 टक्के कर्मचाऱ्यांचा रोजगार अशाश्वत असून चीनमध्ये हे प्रमाण अवघे 33 टक्के असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

जागतिक पातळीवर 2018 मध्ये रोजगार व सामाजिक स्थिती कशी असेल याचा आढावा या जागतिक कामगार संघटनेने अहवालात घेतला आहे. आशिया व पॅसिफिक क्षेत्रात आर्थिक वाढ जोमाने होणार असून अर्थव्यवस्था 5.5 टक्‍क्‍यांनी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारताची अर्थव्यवस्था 7.4 टक्‍क्‍यांच्या गतीने वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे एकूणच दक्षिण आशियामध्ये आर्थिक आघाडी समाधानकारक असेल, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आयसीटी किंवा इन्फर्मेशन, कम्युनिकेशन अँड टेक्‍नॉलॉजी क्षेत्रामध्ये भारतात चांगलीच रोजगारवाढ झाली असून सेवा क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे. परंतु सेवा क्षेत्रातल्या रोजगारामध्ये अशाश्वतता अधिक असून कामाचा व एकंदर सोयीसुविधांचा दर्जाही खालच्या पातळीवर असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

या रोजगारामध्ये स्वयंरोजगार, कौटुंबिक व्यवसायातला रोजगार, कृषीक्षेत्रातील रोजगार आदींचा समावेश आहे. संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांपेक्षा या क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना रोजगाराची हमी, किमान सोयीसुविधा, सामाजिक सुरक्षा आदी बाबींना वंचित रहावे लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

भारतात 77 टक्के नोकरीची अशाश्वतता
संघटित क्षेत्रापेक्षा असंघटित क्षेत्रामधील रोजगारामध्ये सोयीसुविधा व शाश्वती कमी असून भारत, बांग्लादेश, कंबोडिया व नेपाळमधले 90 टक्के कर्मचारी यामध्ये मोडतात. त्यामुळे रोजगाराचे प्रमाण जास्त असले तरी नोकरीची अशाश्वतता आणि सोयीसुविधांची वानवा याबाबतीत भारतातला 77 टक्के कर्मचारी वर्ग भरडला जात असून 2017 ते 2019 या कालावधीत परिस्थिती अशीच राहील, असा अंदाज आहे. अस्थिर व अशाश्वत अशा नोकऱ्या जगभरात 1.4 अब्ज असून यापैकी 39.4 कोटी रोजगार एकट्या भारतात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)