मुंबई – पंजाब नॅशनल बॅंकेमधील कर्ज घोटाळ्याने भारतीय बॅंक क्षेत्र संकटात सापडल्याचे अफवा पसरविण्यात आली आहे. भारतातील बॅंकिंग क्षेत्र हे मजबूत आहे आणि नीरव मोदी प्रकरणी बॅंकांनी गमाविलेली रक्कम ही केवळ तीन दिवसांतील व्याजातून मिळणाऱ्या रकमेएवढी असल्याचे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे सीईओ आशिष चौहान यांनी म्हटले.
हिऱ्यांचा व्यापारी नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि त्यांच्या कंपन्यांनी पंजाब नॅशनल बॅंकेच्या मुंबईतील शाखेतून बनावट एलओयूच्या आधारे बॅंकांतून 13 हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा घोटाळा केला. याप्रकरणी न्यायालयीन कारवाई सुरू आहे. भारतीय बॅंकिंग क्षेत्र मजबूत आणि उत्तम प्रकारे कार्यरत आहे. 1992 मध्ये हर्षद मेहता बॅंक घोटाळयानंतर भारतीय बॅंकिंग व्यवस्था आणि रिझर्व्ह बॅंकेकडून योग्य त्या सुधारणा करण्यात आल्या असत्या तर हा घोटाळा टाळता आला नसता असे चौहान यांनी अमेरिकेतील मेसॅच्युसेट्स इन्स्टिट्ययूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये बोलताना म्हटले.
1992 मध्ये बॅंकांना प्रणालीमध्ये सुधारणा करणे गरजेचे होते. नोटाबंदी, जीएसटी आणि आता बॅंक घोटाळयांमुळे शेअर बाजारावर परिणाम दिसून आला. भारतीय बॅंकिंग क्षेत्र एक कोटी कोटी रुपयांचे आहे. भारतातील बॅंका कर्ज घेणाऱ्यांकडून 12 टक्के दराने व्याज वसूल करतात आणि सामान्य खातेधारक जे बॅंकांत पैसे जमा करतात त्यांना 4 टक्के व्याज देतात. याप्रकारे बॅंका आपला लाभ कमवितात असे त्यांनी म्हटले.
या प्रकारे 100 लाख कोटी रुपयांच्या कर्जा वर 12 टक्के दराने 12 लाख कोटी रुपये भारतातील बॅंका कमवितात आणि महिन्याला सामान्य खातेधारकांना केवळ 1 लाख कोटी रुपये यातून देण्यात येतात. तीन दिवसांत बॅंका 10 हजार कोटी रुपये कमवितात आणि ही रक्कम तीन दिवसांच्या व्याजाएवढी आहे असे त्यांनी स्पष्ट केले. बॅंकिंग क्षेत्र या नाकारात्मक परिस्थितीतून बाहेर पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा