भारतातील एक तृतीयांश मतदार मतदान करत नाहीत

नवी दिल्ली: भारतातील एक तृतीयांश मतदार मतदान करत नाहीत, असे मागील निवडणुकीतील आकडेवारी सांगते. मागील लोकसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार असलेल्या 28.0 कोटी मतदारांनी मतदान केले नाही. भारतातील जेवढ्या मतदारांनी मतदान करणे टाळ्ले आहे. तेवढे मतदार जगातील कोणत्याही देशात नाहीत. एका अहवालानुसार अमेरिकेत 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या वेळी 18.3 कोटी नोंदणीकृत मतदार होते. जगातील सर्वात मोठ्या 20 लोकशाहीवादी देशातील मतदारांची संख्या एकत्र केली, तरी ती 28.2 कोटी एवढी होते. या देशांमध्ये जर्मनी, यूके, स्पेन, दक्षिण कोरिया यांसारखे मोठे देश आहेत. या सर्व देशांचे मिळून एकूण मतदार 28.2 कोटी असण्याच्या पार्श्‍वभूमीवर भारतातील 28.0 कोटी मतदारांनी मतदान न करणे ही काही लहानसहान गोष्ट नाही.

एवढ्या मोठ्या संख्येने लोक मतदान का करत नाहीत, ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 28 कोटी म्हणजे नोंदणीकृत मतदारांचा एक तृतीयांश हिस्सा आहे. तसे पाहिले, तर सर्वात जास्त मते मिळालेला पक्ष हा मतदान न करणाऱ्यांचा पक्ष आहे. त्या निवडणुकीतील सर्वात मोठ्या पक्षाला-भाजपाला 17.2 कोटी मते मिळाली होती, तर दुसऱ्या क्रमांकावरील कॉंग्रेस पक्षाला 10.7 कोटी मते मिळाली होती. दोघांना मिळून मिळालेली मते 28.1 कोटी आहेत, आणि मतदान न केलेले 28 कोटी आहेत. या न दिलेल्या मतांनी केवढा तरी फरक पडला असता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकांच्या मतदान न करण्यामागे एक भावना अशी असते, की मी एक मतदान केले नाही, म्हणून काय बिघडणार आहे? काय फरक पडणार आहे? या शिवाय अन्य काय कारणे असू शकतील? खरं तर सरकारने अनिवासी भारतीयांनानी प्रॉक्‍झीद्वारे मतदानाचा अधिकार दिला आहे. सशस्त दलात काम करणारे आणि मतदानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोस्टाने मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे. पण बरेचसे मतदार केवळ आळसामुळे मतदान केंद्रापर्यंत चार पावले जाऊन मतदार करत नाहीत ही खरीच गोष्ट आहे. मतदान हा आपला एक मौलिक अधिकार आहे, तो आपण बजावला पाहिजे याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे आवश्‍यक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)