भारतातही आहेत इम्रान खानची मुले; रेहम खानचा खळबळजनक दावा

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील राजकीय पक्ष पीटीआयचा प्रमुख आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खानची घटस्फोटित पत्नी रेहम हिने त्याच्याबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे. रेहमने आताच प्रकाशित केलेल्या आत्मचरित्रात इम्रान खानचा रंगेलपणा आणि व्यसन यावर बोलताना असा दावा केला आहे की, इम्रान खान याला अनैतिक संबंधातून काही भारतीय मुलेही आहेत. तसेच, त्याला ड्रग्ज घेण्याची सवय लागली आहे.

एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, रेहमने असा दावा केला आहे की, इम्रान खानचे आयुष्य सेक्स, ड्रग्ज आणि रॉक अॅण्ड रोलने भरले आहे. पाकिस्तानमध्ये सध्या आगामी निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. इमरान खान पाकिस्तानचे पंतप्रधान होण्यास इच्छुक आहेत. त्यातच रेहमने हे पुस्तक प्रकाशित करुन खळबळ उडवून दिली आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून रेहमने केलेल्या आरोपामुळे आगामी निवडणुकीत इम्रान खान याला फटका बसण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष नक्कीच हा मुद्दा उचलून धरतील.

रेहमच्या आत्मचरित्र असलेल्या या पुस्तकाची विक्री गुरुवारपासून ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवर होत आहे. या पुस्तकात रेहम हिने म्हटले आहे की, इम्रान खान कुराणाचे पठण करत नाही. काळ्या जादूवर विश्वास ठेवतो. तसेच, अनैतिक संबंधातून भारतीय मुलेही असल्याचे त्याने स्वत: मान्य केले आहे. रेहमने यापूर्वीही पुस्तकाच्या माध्यमातून इम्रान खानबाबत गंभीर आरोप केले आहेत. इम्रान खान गे आहे. त्याने तिला त्याच्या मित्रांबरोबर संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला होता. लग्नापूर्वी इम्रान खाने तिचा छळ केला होता, असेही रेहमने म्हटले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)