भारतातल्या निवडणूकीपूर्वी सुरक्षा उपाय योजना

नवी दिल्ली – भारतासारख्या देशातल्या निवडणूका होण्यापूर्वी “फेसबुक’मधून डाटा चोरी रोखण्यासाठी महत्वाच्या उपाय योजना केल्या जातील. यासाठी “फेसबुक’मध्ये बनावट प्रोफाईल शोधण्यासाठी “आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल’ वापरले जाईल, असे सुतोवाचही झुकेरबर्ग यांनी केले आहे. अशी “आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल’ यापूर्वी सर्वप्रथम 2017 साली फ्रान्सच्या निवडणूकीमध्ये वापरली गेली होती.

2016 च्या निवडणूकीमध्ये 30 हजार बनावट अकाउंट रशियाच्या सूत्रांना जोडली गेली असल्याचा अंदाज आहे. त्यानंतर हे टूल “फेसबुक’मध्ये वापरण्यात येऊ लागले.

भारतीय निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप न करण्याचा इशारा भारताकडून काल “फेसबुक’ला दिला गेला. आवश्‍यकता भासल्यास झुकेरबर्गना समन्स पाठवण्याचा इशाराही सरकारने दिला होता. या संदर्भाने बोलताना 2018 मध्ये अमेरिकेत मुदतपूर्व निवडणूका घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशयही झुकेरबर्ग यांनी व्यक्‍त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)