भारताच्या 12 मच्छिमारांना मदत केल्याचा पाक नौदलाचा दावा

कराची –  अरबी समुद्रामध्ये भरकटलेल्या 12 भारतीय मच्छिमारांना मानवतावादी दृष्टीकोनातून वैद्यकीय सहाय्य करून परत पाठवण्यात आल्याचा दावा पाकिस्तानी नौदलाने केला आहे. आठ दिवसांपूर्वी मासेमारीसाठी गेले असताना या मच्छिमारांची “एसटी मार्स’ ही बोट तांत्रिक बिघाडामुळे समुद्रामध्ये भरकटली होती.

या नौकेतील मच्छिमारांजवळचे अन्न आणि पिण्याचे पाणी संपत आले होते. मदतीचे वारंवार आवाहन केल्यानंतरही कोणतीही भारतीय बोट या मच्छिमारांच्या मदतीला येऊ शकली नव्हती. त्यानंतर पाकिस्तानच्या नौदलाच्या “पीएनएस आलमगिर’ या नौकेने या नौकेतील मच्छिमारांना सहकार्य दिले, असे पाक नौदलाच्या प्रसिद्धी निवेदनामध्ये म्हतले आहे.

“एसटी मार्स’ या नौकेवर 12 मच्छिमार होते. त्यासर्वांना मानवतावादी भूमिकेतून वैद्यकीय आणि तांत्रिक सहकार्य देण्यात आले. त्यांची बोट दुरुस्त करण्यासाठीही मदत करण्यात आली आणि पुन्हा भारताच्या किनाऱ्याच्या दिशेने रवाना करण्यात आले, असेही या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)