भारताच्या सभ्यतेचा पाकिस्तानने चुकीचा अर्थ लावू नये – केंद्रीय गृहमंत्री

राजनाथ यांचा इशारा
चंडीगढ – शस्त्रसंधी भंगाचे सत्र कायम ठेऊन भारतीय हद्दीत सातत्याने मारा करणाऱ्या पाकिस्तानला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सज्जड इशारा दिला आहे. शक्तिशाली भारताच्या सभ्यतेचा पाकिस्तानने चुकीचा अर्थ लावू नये, असे त्यांनी म्हटले आहे.

मागील दोन आठवड्यांत पाकिस्तानी माऱ्याच्या प्रमाणात वाढ झाली. पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू-काश्‍मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेलगत केलेल्या माऱ्यात 18 जानेवारीपासून 14 भारतीय मृत्युमुखी पडले. त्याचा संदर्भ देऊन राजनाथ यांनी पाकिस्तानला सुनावले. तीन-चार दिवसांपूर्वी पाकिस्तानने ध्वज बैठकीत शस्त्रसंधीचे उल्लंघन न करण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, त्यानंतरही त्या देशाच्या आगळिकी सुरू आहेत.

-Ads-

आमच्या सभ्यतेला मर्यादा आहेत. भारत आता दुबळा देश राहिला नसून शक्तिशाली बनला आहे. अर्थात, शेजारी देशांबरोबरच सर्वांशीच चांगले संबंध ठेवण्याची आमची इच्छा आहे. पाकिस्ताननेही शेजारी म्हणून भारताशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत, असे ते म्हणाले. जम्मू-काश्‍मीर आणि तेथील जनता नेहमीच आमची राहील. त्या राज्यातील स्थिती सुरळित आहे, असे राजनाथ पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्‍नाच्या उत्तरादाखल म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)