भारताच्या विकासाबाबत एडीबी आशावादी 

नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर भविष्यात कायम राहणार आहे. चालू आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी 7.3 टक्‍क्‍यांचा राहील असे आशियाई विकास बॅंकेकडून (एडीबी) सांगण्यात आले. रुपयाचे अवमूल्यन आणि बाहेरील कारणांमुळे आर्थिक बाजारामध्ये अस्थिरता आल्याने अर्थव्यवस्थेसमोर आव्हान असेल असे बॅंकेने आपल्या अहवालात म्हटले.
साधारण सर्व विकसनशील आशियामध्ये विकासदर कायम राहील. याचे प्रमुख कारण देशांतर्गत मागणीमध्ये वाढ होणे होय. चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर कायम राहील. चालू वर्षासाठी भारताचा विकासदराचा अनुमान 7.3 टक्‍के कायम ठेवण्यात आला. 2019 मध्ये त्यात वाढ होत 7.6 टक्‍क्‍यांवर पोहोचेल. नोटाबंदी आणि जीएसटीचे परिणाम आता ओसरण्याची शक्‍यता आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)