भारताच्या पोलाद निर्यातीवर कमी परिणाम

नवी दिल्ली – अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील आणि ऍल्युमिनियम उत्पादनांवर आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेणार असल्याने भारतातील स्टील उद्योगाच्या निर्यातीवर थोडा फार परिणाम होणार आहे. मात्र
आगामी काळात अमेरिका इतर वस्तूवरील आयात शुल्क वाढवू शकते. हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे भारताला निर्यात वाढवायची असल्यास पर्यायी बाजाराचा शोध वाढावा लागणार आहे.

अमेरिकेच्या या निर्णयाचा भारताबरोबर चीनलाही फटका बसणार आहे. अमेरिकेत स्टीलवर 25 टक्के आणि ऍल्युमिनियमवर 10 टक्के कर आकारण्याचा विचार आहे. भारताकडून अमेरिकेत करण्यात येणाऱ्या स्टील आणि ऍल्युमिनियमची निर्यात त्यामानाने अल्प आहे. 2016-17 मध्ये भारतातून 330 दशलक्ष स्टील निर्यात केली, तर स्टीलच्या फिनिश्‍ड उत्पादनांची निर्यात 1.23 अब्ज डॉलर होती.

तर ऍल्युमिनियमची निर्यात 350 दशलक्ष डॉलर्सची होती. अमेरिकेत कर वाढल्यास चिनी कंपन्यांकडून भारतात अधिक प्रमाणात स्टीलची निर्यात करण्यास पसंती देण्यात येईल. भारतासाठी अमेरिका सर्वात मोठी निर्यातदार देश आहे. 2016-17 मध्ये भारताकडून 42.21 अब्ज डॉलरची एकूण निर्यात करण्यात आली होती. देशातून सर्वाधिक निर्यात ही जवाहिर, दागिने आणि रसायनांची करण्यात येत असून त्यावर कोणताही कर नाही. मात्र अमेरिकन कंपन्यांच्या मते भारतीय कंपन्या डम्पिंग करण्यासाठी आपल्या देशाचा वापर करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ट्रम्प हे भारताबरोबरच्या व्यापारी तुटीबद्दल नाराज असून भारताने आयात शुल्कात कपात करावी असे ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)