भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे 14 सप्टेंबरला भूमिपूजन

मोदी, जपानचे पंतप्रधान शिंझो आबेंची उपस्थिती

अहमदाबाद – भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन गुजरातमध्ये 14 सप्टेंबरला होणार आहे. भूमिपूजन समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे उपस्थित राहणार आहेत.

भारताच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पालाच बुलेट ट्रेन प्रकल्पाने ओळखले जाते. या प्रकल्पाचे भुमिपूजन अहमदाबाद शहराजवळील साबरमती रेल्वे स्थानकाच्या मैदानालगत होईल. या प्रकल्पासाठी 98 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. अहमदाबाद आणि मुंबईदरम्यान धावणारी हाय स्पीड रेल्वे सुमारे 2 तासांमध्ये 508 किलोमीटर अंतर कापेल. या रेल्वेचा वेग ताशी 320 किलोमीटर इतका असेल.

रेल्वेच्या कॉरिडॉरचा बहुतांश भाग एलिव्हेटेड ट्रॅक असेल. बुलेट ट्रेन काही अंतर समुद्राखालून कापेल. बुलेट ट्रेन प्रत्यक्षात 2023 पासून धाव घेईल, असा अंदाज आहे. भूमिपूजनानंतर प्रकल्पाचे प्रत्यक्ष बांधकाम पुढील वर्षाच्या अखेरीस सुरू होणार असल्याचे समजते. प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण खर्चापैकी 81 टक्के रक्कम जपानकडून कर्जाच्या रूपाने उपलब्ध केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)