भारताचे पहिले महिला SWAT पथक सज्ज 

पथकात सर्व महिला ईशान्य भारतातील 
नवी दिल्ली: आतापर्यंत फक्त पुरुषांचीच मक्तेदारी असलेल्या SWAT पथकामध्ये देखील भारतीय महिलांनी आपली जागा बनवली आहे. यानिम्मित्ताने देशात पहिल्यांदाच महिला स्पेशल वेपन्स अँड टॅक्‍टिस म्हणजेच SWAT कमांडो पथक सज्ज झाले आहे. 36 महिलांचे हे पथक स्वातंत्र्यदिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी लाल किल्ल्यावर तैनात असणार आहे. तसेच इंडिया गेटवरही महिलांचे SWAT पथक तैनात असेल.
सुमारे 15 महिन्यांच्या कठीण प्रशिक्षणानंतर या पथकाची स्थापना करण्यात आली असून ज्या महिलांचा SWAT पथकात समावेश झाला आहे त्या सर्व ईशान्य भारतातील आहेत. या पथकाला देशासह परदेशातील तज्ज्ञांनी प्रशिक्षण दिले आहे. या महिला पथकाला बॉम्ब निकामी करणे, इमारतींवर चढणे आणि ओलिसांची सुटका करणे याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या पथकाने कालच (10 ऑगस्ट) आपल्या कामाला सुरुवात केली आहे.
याआधी या पथकासाठी पुरुषांनाच प्राधान्य होते. महिला SWAT पथक बनवण्याआधी 36 महिलांना 15 महिने कठोर प्रशिक्षण देण्यात आले. पूर्णत: तरबेज झाल्यानंतर त्यांना ‘स्पेशल वेपन्स अँड टॅक्‍टिस’ पथकात सामील करण्यात आले. महिला कमांडोंचे हे पथक पुरुषांच्या सर्व पाच SWAT पथकांसोबत मिळून दिल्लीत काम करणार आहे. या महिलांनी “SWAT मधील पुरुषांचे वर्चस्व मोडले आहे. महिला हे काम करु शकत नाही, असा अनेकांचा गैरसमज असतो. पण महिला पुरुषांच्या बरोबरीत आहे, हे सांगताना मला अभिमान वाटत आहे, असे दिल्ली पोलिसातील वरिष्ठ अधिकारी प्रमोद कुशवाहा म्हणाले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)