भारताचे टेबल टेनिस मधिल आव्हान संपुष्टात

स्पर्धेत दोन कांस्यपदकाची कमाई

जकार्ता: भारताचे अव्वल टेबल टेनिस खेळाडू शरथ कमल, जी साथियन आणि मनिका बत्रा यांचा उपउपान्त्यपूर्व फेरीत पराभव झाल्यानंतर भारतीय टेबल टेनिस संघाचे आशियाई स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून सदर स्पर्धेत भारताने दोन कांस्यपदकांची कमाई केली आहे.

राऊंड ऑफ सिक्‍स्टीनच्या सामन्यांमध्ये जागतीक क्रमवारीत 33व्या स्थानी असलेल्या शरथ कमलला 14व्या स्थानी असलेल्या चायनिज तैपेइच्या चिह युआन चुआंगने 7-11, 11-9, 10-12, 16-14, 9-11 असा संघर्षपूर्ण पराभव करताना पुढील फेरीत प्रवेश केला तर शरथचे आव्हान संपुष्टात आणले.

तर दुसऱ्या सामन्यात 60 वर्षांनंतर भारताला टेबल टेनिस मिळवून देणाऱ्या साथियनला जापानच्या 19वे मानांकन असलेल्या केंटा मत्सुदिराईयाने 11-9, 4-11, 9-11, 6-11, 10-12 असे पराभुत करत पुढील फेरीत प्रवेश करत साथियनचे आव्हान संपवले. तर अव्वल भारतीय महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्राचा जागतिक मानांकनात पाचव्यास्थानी असलेल्या वांग मन्युने 2-11, 8-11, 8-11, 11-6, 4-11 असा पराभव करताना राऊंड ऑफ सिक्‍स्टीनमध्येच तिचे आव्हान संपुष्टात आणले. या अव्वल खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आल्याने भारतीय संघाचे 18व्या आशियाई टेबल टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून स्पर्धेत भारताने दोन कांस्य पदकाची कमाई करत ऐतिहासीक कामगिरीची नोंद केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)