भारताचे जी-20 यजमानपद रद्द

नवी दिल्ली – भारतात 2019 साली होत असलेल्या सार्वत्रिक निवडणूक आणि मेगा सेंटरचा अभाव यामुळे 2019 च्या 20 परिषदेचे यजमान पद भारताला रद्द करावे लागले आहे. 2019च्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे या परिषदेचे आयोजन 2018 साली करण्याचे ठरवले होते. मात्र आर्जेन्टिना आपल्याकडील ही संधी सोडण्यास तयार नव्हता.

जपानला 2019 च्या या परिषदेच्या यजमानपदाची संधी मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने आणखी काही वर्षे या संधीची वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे. 20 परिषदेच्या यजमानपदाच्या आशियाई देशांच्या फेरीपर्यंत भारताकडे या यजमानपदाची संधी मिळणार नाही.

जागतिक पर्यटकांची पहिली पसंती असणाऱ्या गोव्या सारख्या ठिकाणी भारताने ब्रिक्‍स परिषद आयोजित केली. मात्र, जागतिक पातळीचे मेगा सेंटर नसल्यामुळे अशा परिषदेचे नियोजन करण्यास बराच काळ लागणार आहे. आता यासाठी 2021-2022 मध्ये भारताला हि संधी मिळू शकते, मात्र त्यासाठी इंडोनेशियाशी स्पर्धा करावी लागेल. 20 परिषदेचा उद्देश भारतात बाह्य देशांच्या प्रतिनिधींना आकर्षित करण्याबरोबरच जागतिक पातळीवरचा रोजगार उपलब्ध करून देणे हा होता.

जी 20 परिषद जागतिक पातळीवरच्या पत्रकार आणि प्रतिनिधींना आकर्षित करत असते. भारतात अशा प्रकारच्या परिषदांचे आयोजन करण्याच्या दृष्टीने योग्य आणि जलद कार्यवाही करणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)