भारताची समाधान कारक वाटचाल ; विराट कोहलीने मोडला सचिनचा विक्रम

भारतीय कर्णधार विराट कोहली प्रत्येक सामन्यानंतर नवनवे विक्रम आपल्या नावे करत आहे. गुरूवारपासून सुरू झालेल्या सामन्यात विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडला आहे. सामना सुरू होण्याआधी विराटला हा विक्रम मोडण्यासाठी फक्त सहा धावांची गरज होती.

विराट कोहलीला कसोटीमध्ये सहा हजार धावा करण्यासाठी फक्त सहा धावांची होती. कोहलीने आतापर्यंत 119 डावांत 6000 धावांचा टप्पा पूर्ण केला. सचिनने 120 डावांत सहा हजार धावा केल्या होत्या. त्यामुळे धावा काढण्याच्या बाबतीत विराट सचिनच्या एक पाऊल पुढे आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आज विराट कोहलीने चौथ्या कसोटीत सहा धावा काढत सचिनचा विक्रम मोडला. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात विराट सचिनचा हा विक्रम मोडेल असा विश्वास त्याच्या चाहत्यांना होताच.

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत विराट कोहलीने सहा डावांत 440 धावांचा डोंगर उभा केला आहे. या मालिकेत विराट विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. आतापर्यंत विराट कोहलीने 69 कसोटी सामन्यातील 118 डावांत फलंदाजी करताना 23 शतकांसह 5994 धावा केल्या आहेत. यादरम्यान विराट कोहलीची सरासरी 55 आहे. कसोटीमध्ये विराट कोहलीची 248 धावांची सर्वोत्तम खेळी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)