भारताची संयुक्तराष्ट्रांच्या मानवाधिकार मंडळावर निवड 

मतदानात सर्वाधिक 118 मतांचा पाठिंबा 

संयुक्तराष्ट्रे:  संयुक्तराष्ट्रांच्या मानवाधिकार समितीवर भारताची निवड झाली आहे. ही निवड तीन वर्षांसाठी असून 1 जानेवारी 1919 पासून भारत या समितीचा अधिकृत सदस्य बनणार आहे. भारताने एशिया-पॅसिफीक गटातून या समितीवर जाण्यासाठी अर्ज केला होता. त्यात एकूण पाच जागा होत्या त्या पाच जागांसाठी एकूण पाच देशांनीच अर्ज केल्याने भारताची निवड निश्‍चीतच होती. भारतासह या गटातून बहारीन, बांगलादेश, फिजी आणि फिलीपाईन्स या देशांनाही तेथे सदस्यत्व मिळाले आहेत.

या समितीवर निवडून येण्यासाठी प्रत्येक राष्ट्राला 193 पैकी किमान 97 देशांची मते मिळणे आवश्‍यक होते. त्यात भारताला 188 देशांचा पाठिंबा मिळाला आहे. त्याविषयी प्रतिक्रीया देताना भारताचे संयुक्तराष्ट्रांतील कायम प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन यांनी म्हटले आहे की या मतदानात भारताला मिळालेला पाठिंबा पहाता त्यातून भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर किती महत्व प्राप्त झाले आहे हे अधोरेखीत झाले आहे.

भारताखालोखाल फिजीला 187 देशांचा तर बांगलादेशला 178 देशांचा पाठिंबा मिळाला. या आधी सन 2011 ते 2014 आणि 2014 ते 2017 या अवधीत भारताने या मंडळावर सदस्य म्हणून काम पाहिले आहे. लागोपाठ दोनवेळा भारताची या मंडळावर निवड झाल्याने तिसऱ्यांदा लगेच भारताला या निवडणुकीला उभे राहता आले नव्हते. संयुक्तराष्ट्रांत मानवाधिकाराशी संबंधीत हे स्वतंत्र कौन्सिल सन 2006 साली स्थापन करण्यात आले आहे. पाच खंडांतील देशांना या मंडळावर समान संख्येने प्रतिनिधीत्व दिले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)