भारताची फलंदाजी कोलमडली…

भारत-इंग्लंड दुसरा कसोटी क्रिकेट सामना
लंडन – पावसाचा व्यत्यय कायम असताना अखेरीस दुसऱ्या दिवशी का होईना सुरू झालेल्या भारत व इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात नाणेफेक गमावून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची पावसाने व्यत्यय आल्याने थेट तिसऱ्या सत्रातच खेळ सुरू करण्यात आला त्यानंतर लागलीच चेतेश्‍वर पुजारा धावबाद झाला तर कर्णधार विराट कोहली 23 धावा काढून बाद झाला. ख्रिस वोक्‍स याने त्याला स्लिपमध्ये झेलबाद होण्यास भाग पाडले.

त्याआधी आदल्या रात्रीपासून पडत असलेल्या पावसाच्या सरींमुळे पहिल्या दिवशी एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नव्हता. त्यानंतर पावसाचे सावट असतानाही दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर शेकडो क्रिकेटशौकिनांनी गर्दी केली. ढगाळ हवामानात आणि थंडगार वारे वाहात असताना इंग्लंडने अपेक्षेप्रमाणेच नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. परंतु अँडरसनने प्रथम मुरली विजयला आणि मग लोकेश राहुलला बाद करीत भारताची 6.3 षटकांअखेर 2 बाद 11 अशी अवस्था केली. मुरली विजयला भोपळाही फोडता आला नाही, तर राहुलने 8 धावा केल्या.

-Ads-

26 षटकांचा खेळ संपला तेव्हा भारताकडून आर. अश्विन आणि अजिंक्य राहणे फलंदाजी करीत होते. राहणे 18 तर अश्विनने 8 धावा केल्या होत्या. भारताने 26 षटकामध्ये 6 बाद 73 धावा बनविल्या होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)