‘भारताची पोषण आव्हाने’ यावरील राष्ट्रीय समितीची पहिली बैठक

नवी दिल्ली : पोषण अभियानांतर्गत भारताची पोषण आव्हाने यावरील राष्ट्रीय समितीची पहिली बैठक नवी दिल्ली येथे झाली. नीती आयोगाचे उपप्रमुख डॉ. राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. ही समिती दर सहा महिन्यांनी पंतप्रधानांना आपला अहवाल सादर करणार आहे.

वित्त वर्ष 2018-19 मध्ये पोषण आहाराच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी 235 जिल्ह्यांचा समावेश करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. 718 पैकी 315 जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे तर उर्वरित 167 जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या टप्प्यात आहे. अंगणवाडी निरिक्षकांना काही राज्यांच्या अडचणी लक्षात घेऊन टॅब्लेट ऐवजी स्मार्टफोन देता येऊ शकेल, असा निर्णय या बैठकीत झाला.

-Ads-

पोषण अभियानात बाळांची घरात काळजी (एचबीवायसी) हा महत्त्वाचा घटक असेल. यात 3 ते 15 महिन्यांच्या बाळांच्या घरी जाऊन मातांमध्ये पोषणाबाबत जागरुकता निर्माण केली जाईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)