भारताचा सर्वांत उंच राष्ट्रध्वज तीन महिन्यांनी पुन्हा फडकला

नवी दिल्ली – भारत-पाकिस्तान सीमेवर सर्वांत उंचीवर उभारण्यात आलेला आणि देशाच्या सन्मानाचे प्रतिक असलेला राष्ट्रध्वज गेल्या तीन महिन्यांपासून गायब होता. मात्र, स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर तो पुन्हा फडकवण्यात आला आहे. 360 फुट उंच खांबावर हा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. पाकिस्तानातील लाहोर येथूनही तो दिसतो.

भारताचा हा राष्ट्रध्वजाचे मोठा गाजावाजा करीत उद्घाटन करण्यात आले होते. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून तो गायब होता. जास्त उंचीवर असल्याने राष्ट्रध्वज वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे फाटत चालला होता. या पार्श्वभूमीवर पंजाब सरकार सध्या इतक्‍या उंचीवर लावण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाला फाटण्यापासून बचावासाठी उपाय शोधण्यात येत आहेत.

भारत-पाकिस्तान सीमेवर मार्च 2017 मध्ये देशातील हा सर्वाधिक उंच राष्ट्रध्वज लावण्यात आला. अटारी व्यतिरिक्त अमृतसरच्या रंजीत एव्हेन्यूवर देखील 170 फूट उंचीवर राष्ट्रध्वज लावण्यात आला होता. या झेंड्याच्या देखभालीची जबाबदारी अमृतसरच्या इम्प्रूवमेंट ट्रस्टची आहे. अटारी सीमेवर 360 फूट उंचीवर लावण्यात आलेला हा राष्ट्रध्वज आत्तापर्यंत तीनदा फाटला आहे. त्याचबरोबर रंजीत अव्हेन्यूवरील झेंड्यासाठी आत्तापर्यंत 9 लाख रुपये तर अटारी येथील ध्वजासाठी 6 लाख रुपये खर्च झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)