भारताचा शांततेवर दृढ विश्वास, पण सार्वभौमत्वाशी तडजोड नाही

नवी दिल्ली: भारताचा शांततेवर दृढ विश्वास आहे. शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत कायम कटिबद्ध आहे. मात्र आत्मसन्मान आणि सार्वभौमत्वाशी तडजोड करता येणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
“मन की बात या कार्यक्रमाच्या 48 व्या भागात ते आज बोलत होते. मोदी म्हणाले, 20 व्या शतकात जगात झालेल्या दोन युद्धात एक लाख भारतीय सैनिकांनी संबंध नसतानाही आपले सर्वोच्च बलिदान दिले. संयुक्त राष्ट्राच्या शांतता सैन्यात मोठे योगदान देणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे. जगात शांतता नांदावी यासाठी दशकांपासून भारतीय सैनिक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे ते म्हणाले.
दहशतवादाच्या आडून छुपे युध्द पुकारणाऱ्यांना भारतीय सैन्याने तोडीस तोड प्रत्युत्तर दिले, असे सांगून 2016मध्ये केलेल्या लक्ष्य भेदी हल्ल्याचे स्मरण देश करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. यानिमित्त देशात विविध ठिकाणी सैन्य दलाने प्रदर्शने आयोजित केली आहेत. भारताच्या सामर्थ्याचे आणि जनतेचे रक्षण करण्यासाठी आपले जवान प्राणाची बाजी कशी लावतात याची जनतेला विशेष करून युवकांना यांच्या माध्यमातून माहिती मिळावी हा याचा उद्देश आहे. “पराक्रम पर्वा’सारखा दिवस युवकांना आपल्या लष्कराच्या झळाळत्या वारश्‍याचे स्मरण करून देतो, असे ते म्हणाले.
पुढच्या महिन्यात 8 तारखेला “हवाई दल दिन’ साजरा होणार आहे. याविषयी ते म्हणाले, भारतीय हवाई दल हे 21व्या शतकातल्या सामर्थ्यवान आणि शूर हवाई दलापैकी एक आहे. 1947, 1965, 1971 आणि 1999मध्ये हवाई दलाने बजावलेल्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.
स्वच्छ भारत अभियान केवळ भारतातच नव्हे तर जगात यशोगाथा ठरली आहे. प्रत्येक जण त्याविषयी बोलत आहे. स्वच्छताविषयक जगातले सर्वात मोठे संमेलन महात्मा गांधी इंटरनॅशनल सॅनिटेशन कन्व्हेन्शन भारताने आयोजित केले आहे. जगभरातले स्वच्छता मंत्री आणि तज्ज्ञ याला उपस्थित राहणार असून आपले अनुभव विषद करणार आहेत.
डॉ मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला यासारख्या महान व्यक्तित्वानी गांधीजींच्या विचारातून सामर्थ्य प्राप्त केले.
गांधीजीनी स्वातंत्र्य लढ्याला जन चळवळीचे स्वरूप दिले. हे त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातले सर्वात मोठे योगदान आहे, असे पंतप्रधान म्हणाले. विशेष प्रसंगी खादी आणि हातमागाची वस्त्रे जनतेने खरेदी करावीत. तसेच सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एकता दौड आयोजित करून प्रत्येकाने त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)