भारताचा वेस्टइंडीजवर ५ गडी राखून विजय

कोलकाता: भारत आणि वेस्टइंडीज यांच्या दरम्यान रंगलेल्या पहिल्या २०-२० सामन्यांमध्ये आज भारताने वेस्टइंडीजवर ५ गाडी राखून विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्मा याचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवत पाहुण्या वेस्टइंडीजला केवळ १०९ धावांमध्ये रोखले. भारत हे लक्ष सहज पार करेल असा अंदाज होता मात्र वेस्टइंडीज गोलंदाजांनी भेदक मारा करत भारतीय संघापुढे चिंताजनक स्थिती निर्माण केली होती. मात्र दिनेश कार्तिक आणि के. एल. राहुल यांच्या संयमी भागीदारीमुळे भारताला हा सामना जिंकता आला.

तत्पूर्वी, भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यानंतर फॅबिएन ऍलनने अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजी मुळे वेस्ट इंडीजला 20 षटकांमध्ये 109 धावांची मजल मारता आल्याने भारता समोर विजयासाठी 110 धावांचे आव्हान आहे.
यावेळी दुसऱ्याच षटकांत उमेशने अनुभवी फलंदाज दिनेश रामदीनला बाद करत विंडीजला पहिला धक्‍का दिला. तर, यानंतर चांगली सुरुवात करुन देणारा शाई होप चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. यावेळी होपने 10 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 14 धावा केल्या. तर, एकदिवसीय मालिकेतील हिरो ठरलेला शेमरॉन हेतमायर पुन्हा एकदा जसप्रीत बुमराहसमोर अपयशी ठरला. हेतमायरला या सामन्यात केवळ 10 धावांची खेळी करता आली.
यानंतर, धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कायरन पोलार्डला बाद करत कृनाल पांड्याने आपल्या पहिल्या बळीची नोंद केली. तर, लागलीच ब्राव्होही त्याच्या पाठोपाठच तंबूत परतला. त्यामुळे आकराव्याच षटकांत विंडीजची 5 बाद 49 अशी अवस्था झाली होती. त्यामुळे, पन्नाशीच्या आतच विंडीजचा निम्मा संघ माघारी परतला. तर, रोव्हमन पॉवेल देखिल केवळ 4 धावा करुन तंबूत परतल्याने विंडीजची 6 बाद 56 अशी अवस्था झाली. तर, कर्णधार कार्लोस ब्रेथवेट देखिल केवळ 4 धावा करुन बाद झाला. यानंतर फॅबिएनने धावांचा वेग वाढवत फटकेबाजी करताना 19 चेंडूत 27 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. तर, किमो पॉलने उमेशयादवच्या षटकांत 16 धावा वसूल करत विंडीजच्या संघाला शंभरी गाठुन देत संघाला 109 धावांची मजल मारुन दिली. यावेळी यादवने 3 बळी मिळवले. तर, पांड्या, अहमद, बुमराह आणि यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)