भारताचा वेस्टइंडिजवर ‘मोठा’ विजय

मुंबई – भारत वि. वेस्टइंडिज यांच्यातील चौथ्या सामन्यात भारताने वेस्टइंडिजचा 224 धावांनी पराभव केला आहे. भारताने आजच्या विजयासह पाच सामन्याच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.

रोहित शर्मा आणि अंबाति रायुडू यांच्या शतकांच्या जोरावर भारताने वेस्टइंडिजसमोर 378 धांवाचे लक्ष्य ठेवले होते. विजयासाठी आवश्यक 378 धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडिजचा संघ सर्वबाद 153 धावांच करू शकला. विंडीजतर्फे होल्डरने सर्वाधिक 54 धाव केल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याने 137 चेडूंत (20 चौकार आणि 4 षटकार) 162 धावा केल्या. तर विराट कोहली हा 16 धावांवर बाद झाल्यानंतर फलंदाजीस आलेल्या अंबाती  रायुडू याने 81 चेंडूत ( 8 चौकार आणि 4 षटकार) 100 धावा करत महत्वाची भूमिका पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)