भारताचा मानहानीकारक पराभव, विराटाचे शतक वाया 

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने भारतासमोर २८४ धावांचे लक्ष्य ठेवले होते.  २८४ धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाज सर्वबाद २४० धावांपर्यंतच मजल मारू शकले. भारताला ४३ धावांनी पराभूत व्हावे लागले आहे. विराट कोहली (१०७) वगळता अन्य  कोणताही भारतीय फलंदाज उत्तम कामगिरी करू शकला नाही.

भारताच्या डावाची सुरुवात देखील खराब झाली. पहिल्या सामन्यात शतक झळकावणारा रोहित शर्मा दुसऱ्या सामन्याप्रमाणेच याही सामन्यात अपयशी ठरला.  तो ८ धावा काढून बाद  झाला.  त्यानंतर फलंदाजीस आलेल्या कोहलीने शिखर धवन समवेत भाताचा डाव सवावरला. परंतु, शिखर धवन मिळालेल्या चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करू शकला नाही तो ३५ धावांवर बाद  झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अंबाती रायडू, रिषभ पंत, महेंद्रसिंग धोनी हे फलंदाज स्वस्तात बाद झल्यावर विंडीज विजय मिळवणार असल्याचे चिन्हे दिसू लागली. त्यानंतर  विराट कोहलीने आपले शतक पूर्ण केले आणि तो ही बाद झाला.  तळाचे  भारतीय फलंदाज काही चमत्कारिक कामगिरी करू शकले नाहीत. भारत सर्वबाद २४० धावांपर्यंतच मजल मारू शकला.

दरम्यान, भारताने प्रथम नेणेफेकीचा कौल जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधार विराट  कोहलीचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरविला. २५ धावांवर  विंडीजला पहिला झटका बसला. सलामीवीर सी. हेमराज हा बाद झाला त्यानंतर दुसरा सलामीवीर पॉवेल देखील बाद झाला ८ षटकात ४१ धावांच्या मोबदल्यात त्यांचे दोन्ही सलामीवीर माघारी परतले. त्यानंतर खलील अहमदने मार्लीन सॅम्युअल्सला बाद करत भारताला तिसरे यश मिळवून दिले.

ठराविक अंतराने विंडीजने फलंदाज बाद होत होते तरी मागील सामन्यात हिरो ठरलेला होप या सामन्यात देखील चांगली फलंदाजी करत होता.  त्याने एक बाजू सांभाळत ११३ चेंडूत ९५ धांवांची झुंझार खेळी केली. त्याला जसप्रीत बुमराहने त्रिफळाचीत बाद केले.  शेवटी ए. नर्स याने देखील वेगवान  ४० धावा करत संघाची धावसंख्या २७०च्या पुढे नेली आणि शेवटी ५० षटकापर्यंत विंडीजने ९ बाद २८३ धावांपर्यंत मजल मारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)