भारताचा फेसबुकला इशारा…

भारताच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई
नवी दिल्ली – भारताच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास सोशल मिडीया साईट्‌सवर विशेषत: फेसबुक वर कारवाई केली जाईल असा इशारा भारताचे दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. केंब्रिज ऍनालॅटिका या ब्रिटीश कंपनीने सुमारे 50 लाख फेसबुक खातेदारांचा डाटा बेकायदेशीरपणे वापरून त्याचा युरोप व अमेरिकेतील राजकारण्यांना उपयोग करून दिल्याचे प्रकरण नुकतेच उघड झाले आहे या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हा आरोप केला आहे.

भारतात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या डाटाचा उपयोग करून घेतला आहे काय याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. डाटा चोरी करणाऱ्या कंपनीने कॉंग्रेसशी संधान साधले होते अशी बातमी मध्यंतरी आली होती असे त्यांनी नमूद केले. त्यावर कॉंग्रेसनेही तातडीने प्रतिक्रीया देताना निवडणूक आयोगाने हा चोरण्यात आलेला डाटा भारतातील नेमका कोणी वापरला याची खरीच चौकशी करावी असे आव्हान कॉंग्रेसचे मनिष तिवारी यांनी केला आहे. कॉंग्रेसच्या सोशल मिडीया सेल सांभाळणाऱ्या दिव्या स्पंदना यांनी मात्र सरकार इराक मध्ये जे 39 भारतीय मारले गेले त्या प्रकरणावरून देशवासियांचे लक्ष अन्यत्र विचलीत करण्यासाठी भाजपच्या प्रवक्‍त्यांनी हा भलताच खटाटोप सुरू केला आहे असा आरोप केला.

या अनुषंगाने पत्रकारांशी बोलताना रविशंकर प्रसाद म्हणाले की भारतातील कोणीही सोशल मिडीयाचा वापर करून सरकारला प्रश्‍न विचारावेत त्याविषयी आमचे काहीही म्हणणे नाही पण विदेशी संस्थांची मदत घेऊन सोशल मिडीयाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असे त्यांनी नमूद केले. त्यांनी थेट फेसबुकचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनाच इशारा देताना म्हटले आहे की फेसबुकच्या भारतीय खातेदारांचा डाटा चोरून त्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला गेल्यास तो खपवून घेतला जाणार नाहीं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)