भारताचा पहिला डाव २७४ धावांवर आटोपला, विराटची १४९ धावांची एकाकी झुंज

बर्मिंगहॅम: इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने एकाकी झुंज देत १४९ धावा केल्या. कोहलीने केलेल्या खेळीमुळेच भारतीय संघाला सन्मान जनक २७४ एवढी धावसंख्या उभारता आली आहे.

सलामीच्या फलंदाजांनी अर्धशतकीय भागीदारी केली नंतर मात्र सॅम कुर्रानने डावातील 14व्या षटकातील चौथ्या चेंडूवर मुरली विजयला पायचित केले. तर सहाव्या चेंडूवर लोकेश राहुलला बाद करीत इंग्लंडला लगेचच दुसरे यश मिळवून दिले. भारतीय संघ या धक्‍क्‍यांतून सावरण्याच्या आतच कुर्रानने पुढच्या षटकातील पाचव्या चेंडूवर शिखर धवनला बाद करीत भारताच्या बिनबाद 50 अशा आश्‍वासक प्रारंभानंतर 3 बाद 59 अशी घसरगुंडी घडवून आणली. विजयने 45 चेंडूंत 4 चौकारांसह 20 धावा, तर धवनने 46 चेंडूंत 3 चौकारांसह 26 धावा केल्या.

उपाहाराला भारताने 3 बाद 76 धावांची मजल मारली होती. विराट कोहलीने अजिंक्‍य रहाणेच्या साथीत चौथ्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी करताना भारताचा डाव सावरला. परंतु दुसऱ्या सत्रात बेन स्टोक्‍सच्या माऱ्यामुळे भारताचा डाव पुन्हा घसरला. स्टोक्‍सने उपाहारानंतरच्या सातव्या षटकांत अजिंक्‍य रहाणेला, तर नवव्या षटकांत दिनेश कार्तिकला बाद करीत भारताची 5 बाद 100 अशी घसरगुंडी घडवून आणली. रहाणेने 1 चौकारासह 15 धावा केल्या. तर कार्तिकला भोपळाही फोडता आला नाही.
कोहलीने एका बाजूने सतत बळी जात असताना देखील संयम राखत फलंदाजी केली. कोहलीने केलेल्या १४९ धावांच्या खेळीमुळेच भारतीय संघाला सर्वबाद २७४ एवढी धावसंख्या उभारता आली. भारत पहिल्या डावात १३ धावांनी इंग्लंडच्या पिछाडीवर आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावास सुरवात झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)