भारताचा डाव ६४९ /९ घोषित, रवींद्र जडेजाचे पहिलेवहिले कसोटी शतक 

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसर्या दिवशी भारतीय संघाने जबरदस्त कामगिरीत केली आहे. भारतीय संघाने ६४९/९ धावांवर आपला पहिला डाव घोषित केली. विराट कोहलीआणि रविंद्र  जडेजा यांच्या शतकी खेळ्या आजच्या दिवसाचे वैशिट्य ठरले. रिषभ पंत याचे शतक केवळ ८ धावांनी हुकले तो ९२ धावांवर बाद झाला.

तत्पूर्वी, विराट कोहली याने पहिल्या सत्रात आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर तो १३९ धावांवर बाद झाला. दुसर्या बाजूला जडेजाने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतले आणि किल्ला लढवला. त्याने तळाच्या फलंदाजांना हाती घेत आपले पहिलेवहिले कसोटी शतक पूर्ण केले.

-Ads-

भारताच्या  फलंदाजांनी या पहिल्या डावात जबरदस्त कामगिरी करत ६४९ धावांचा डोंगर रचला. वेस्ट इंडीजचे गोलंदाज या डावात पूर्णतः निष्प्रभ ठरले. त्यांच्याकडून या सामन्यात खूप खराब गोलंदाजी झाली. विंडीजतर्फे बिशू याने २१७ धावांच्या मोबदल्यात सर्वाधीक ४ बळी मिळवले.

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)