भारताचा ज्युनिअर हॉकी संघ युथ ऑलिम्पिकसाठी पात्र 

अंतिम फेरीत मलेशियावर केली मात 
मुंबई – भारतीय कुमार संघाने युवा ऑलिंपिक पात्रता हॉकी स्पर्धेतील मलेशियाविरुद्धच्या अंतिम लढतीत अखेरच्या सेकंदात गोल स्वीकारला, पण गोलरक्षक प्रशांत चौहानने शूटआउटमध्ये चमकदार कामगिरी केल्यामुळे भारताने विजेतेपद पटकावले. बॅंकॉकला झालेल्या या स्पर्धेत भारतीय मुलींना चीनविरुद्धच्या अंतिम लढतीत 1-4 अशी हार पत्करावी लागली, पण त्यांनीही यापूर्वीच युवा ऑलिंपिकची पात्रता साध्य केली होती. पाच जणांचा संघ असलेल्या या स्पर्धेतील लढत तीस मिनिटांची असते. मुलांच्या अंतिम लढतीत शूटआऊट 2-1 असा जिंकत भारतीयांनी बाजी मारली.

तर दुसरी कडे, अतिशय अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारतीय ज्युनिअर हॉकी संघाने मलेशियावर 2-1 ने मात करत युथ ऑलिम्पिक पात्रता फेरीचं विजेतेपद मिळवलं आहे. निर्धारित वेळेत सामना 4-4 असा बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शुटआऊटवर या सामन्याचा निकाल काढण्यात आला, ज्यामध्ये भारताने 2-1 अशी बाजी मारली. बॅंकॉक शहरात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या विजयामुळे भारताला ऑगस्ट महिन्यात अर्जेंटिनाच्या बुईनोस आयरेस शहरात पार पडणाऱ्या युथ ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. युथ ऑलिम्पीकमध्ये हॉकीची स्पर्धा 5 खेळाडूंनिशी खेळवली जाणार आहे.

सामन्यात मलेशियाच्या मोहम्मद अनुरने 11 व्या मिनीटाला गोल करत आपल्या संघाचं खातं उघडलं. मात्र या आक्रमणामुळे दडपणाखाली न येता अवघ्या एका मिनीटातचं भारताच्या राहुल कुमार राजभारने गोल करत भारताला बरोबरी साधून दिली. यानंतर कर्णधार विवेक सागर प्रसादने गोल झळकावत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र मलेशियाकडून मोहम्मद मोहरमने गोल करुन मलेशियाला पुन्हा 2-2 अशी बरोबरी साधून दिली. यानंतर पुढच्या सत्रांत आक्रमक खेळी करत भारताने 4-2 अशी आघाडी घेतली. मात्र मोक्‍याच्या क्षणी बचावफळीतल्या खेळाडूंनी केलेल्या क्षुल्लक चुकांच्या आधारावर मलेशियाने सामन्यात पुनरागमन करत 4-4 अशी बरोबरी साधली.
यानंतर पेनल्टी शुटआऊटमध्ये भारतीय खेळाडूंनी मलेशियाची कडवी झुंज मोडून काढत 2-1 अशी बाजी मारली. भारतीय महिलांना मात्र अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. सलीमा टेटेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाला चीनकडून 1-4 असा पराभव स्विकारावा लागलाय.

मार्गदर्शक शूअर्ड मरिन यांना जीवदान? 
राष्ट्रकुल क्रीडा अपयशानंतर शूअर्ड मरिन यांना भारतीय हॉकी संघाच्या मार्गदर्शकपदी कायम ठेवण्याचा निर्णय झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रकुल स्पर्धेतील अपयशाचा अहवाल मंगळवारी जाहीर होण्याची शक्‍यता आहे. मरिन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर मायदेशात म्हणजे नेदरलॅंड्‌सला गेले आहेत. ते अद्याप भारतात परतलेले नाहीत. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू झालेल्या शिबिरातही दाखल झालेले नाहीत. मात्र मरिन यांना व्हिसा मिळण्यात काही अडचणी आल्या आहेत, त्या दूर झाल्यावर मरिन शिबिरात दाखल होतील, असे सांगितले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)