भारताचा आयर्लंडवर 143 धावांनी विजय

संक्षिप्त धावफलक

भारत- 20 षटकांत 4 बाद 213 (लोकेश राहुल 70, सुरेश रैना 69, हार्दिक पांड्या नाबाद 32) वि.वि आयर्लंड 12.3 षटकांत सर्वबाद 70 (पिटर्फोल्ड 14, गॅरी विल्सन 15, उमेश यादव 19-2, चहाल 21-3, कुलदीप यादव 16-3).

डब्लिन – लोकेश राहुल, सुरेश रैना आणि हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीनंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्यामुळे भारताने आयर्लंडचा 143 धावांनी पराभव करत दोन सामन्यांची मालिका एकतर्फी जिंकत आपल्या इंग्लंड दौऱ्याची धडाक्‍यात सुरूवात केली आहे.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारीत 20 षटकांत 4 बाद 213 धावांकरत आयर्लंडसमोर विजयासाठी 214 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र प्रत्युत्तरात फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडला 12.3 षटकांत केवळ 70 धावांच करता आल्याने त्यांना 143 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

214 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या आयर्लंडची सुरुवात खराब झाली पहिल्या सहा षटकांतच त्यांचे चार फलंदाज परतले या धक्‍यातून ते शेवट पर्यंत सवरलेच त्यामुळे केवळ 12.3 षटकांत 70 धावांतच त्यांचा संपुर्ण संघ परतला. यावेळी भारताकडून युझुवेंद्र चहाल आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 3 गडी बाद केले तर उमेश यादवने 2 गडी बाद केले.

तत्पूर्वी, सलामीला उतरलेल्या विराट कोहलीला (9) पीटर चेजने सलग दुसऱ्या सामन्यात बाद केले. परंतु राहुलने 36 चेंडूंत 3 चौकार व 6 षटकारांसह 70 धावा फटकावताना सुरेश रैनाच्या साथीत 9.3 षटकांत 106 धावांची भागीदारी करीत भारताला मजबूत पायाभरणी करून दिली. चौथ्या क्रमांकावर आलेला रोहित शर्मा भोपळाही फोडू शकला नाही. तर सुरेश रैनाने 45 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकारांसह 69 धावांची खेळी करताना मनीष पांडेच्या साथीत चौथ्या विकेटसाठी 5 षटकांत 41 धावांची भागीदारी करीत भारताची आगेकूच कायम राखली. त्यानंतर पांड्याने 9 चेंडूंत 1 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 32 धावा फटकावताना भारताला 213 धावांची मजल मारून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)