भारताकडून न्या. दलवीर भंडारीचे पुन्हा नामांकन

संयुक्त राष्ट्रे, दि. 30 – आंतरराष्ट्रीय न्यायालयावर न्यायाधिश म्हणून भारतातर्फे न्या दलवीर भंडारी यांचेच नाव पुन्हा पुढे करण्यात आले असून या निवडीसाठी त्यांचा अर्ज आज भारतातर्फे दाखल करण्यात आला आहे. या न्यायालयावर नियुक्‍तीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 3 जुलै अशी असून येत्या नोव्हेंबर महिन्यात त्या पदासाठी निवडणूक होणार आहे.
भंडारी हे या पदावर सध्या कार्यरत आहेत त्यांनाच पुन्हा या पदावर काम करण्यासाठी संधी देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.त्यामुळे त्यांना तेथे नऊ वर्षे काम करण्याची संधी मिळणार आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये भंडारी यांची मुदत संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या फेर नियुक्तीसाठी त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. हे आंतरराष्ट्रीय न्यायालय नेदरलॅंडमधील हेग येथे कार्यरत आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयावर निवड होण्यापुर्वी भंडारी यांनी भारतात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश म्हणून काम केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)