भारतविरुद्ध आफ्रिका पहिला वनडे सामना; अय्यर, कार्तिक, पांडे यांच्यात चुरस

डर्बन -भारतविरुद्ध आफ्रिका पहिल्या सामन्यात भारतीय संघासमोर अंतिम 11 खेळाडू निवडण्याचे आव्हान असले, तरी त्यातही मधल्या फळीतील स्थानासाठी श्रेयस अय्यर, मनीष पांडे आणि दिनेश कार्तिक यांच्यात चुरस आहे. श्रीलंकेविरुद्ध दोन अर्धशतके झळकावल्यामुळे श्रेयस अय्यरचा दावा मजबूत असला, तरी अनुभवाच्या निकषावर कार्तिकचे पारडे जड आहे. उद्या पावसाची शक्‍यता असल्यामुळे भारताने एकच फिरकी गोलंदाज खेळविण्याचे ठरविल्यास कुलदीप यादवला संधी मिळेल. दुसऱ्या फिरकी गोलंदाजाची गरज भासल्यास केदार जाधवचा समावेश निश्‍चित ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)