भारतरत्न नककी कुणाला? वीर सावरकरांच्या नशीबी पुन्हा काळे पाणी : संजय राऊत

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारने माजी राष्टपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे.याशिवाय भारतीय जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारीका यांचाही भारतरत्न पुरस्काराने मरणोत्तर सन्मान करण्यात आला आहे. मात्र या यादीत केंद्र सरकारने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर न केल्याने संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, भारतरत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट केले कि, ”भारतरत्न नककी कुणाला? आज नानाजी देशमुख, भुपेश हजारीका आणी प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न बनवले. परंतु वीर सावरकरांच्या नशीबी पुन्हा काळे पाणी.” त्यानंतर तासाभराने राऊत यांनी अजून एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये भारतरत्न पुरस्काराच्या सन्मानचिन्हाचा फोटो शेअर करत म्हटले आहे की, ‘विनायका प्राण तळमळला’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)