भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यानी केले अभिवादन

मुंबई – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव महेश झगडे उपस्थित होते.

तसेच आंबेडकर  जयंतीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास विधान परिषदेच्या सदस्या  हुस्नबानू खलिफे व विधानसभेचे माजी सदस्य मधु चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिव विलास आठवले, अवर सचिव रविंद्र जगदाळे, सुनिल झोरे, विधानसभा अध्यक्षांचे विशेष कार्य अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.त्याचप्रमाणे मंत्रालयात  शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)