भारतरत्न डॉ.एम. विश्वेश्वरय्या यांना गुगलची डूडलद्वारे मानवंदना 

भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ १५ सप्टेंबर रोजी देशभरात इंजिनीअर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो. याच निमित्ताने गुगलनेही डॉ. विश्वेश्वरय्या यांना मानवंदना देण्यासाठी एक खास डूडल तयार केले आहे. या डूडलमध्ये गुगलने विश्वेश्वरय्या यांचे चित्र रेखाटले आहे. व त्यांच्यामागे एका पुलाचे चित्र रेखाटले असून पुलावर गुगल असे लिहिलेले स्पष्टपणे दिसत आहे.

डॉ.एम. विश्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी तेलगू कुटुंबात झाला होता. पुण्यातील सायन्स कॉलेजमधून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी प्रथम क्रमांकाने मिळवली. १९३२ मध्ये ‘कृष्ण राजा सागर’ धरण योजनेत त्यांनी मुख्य अभियंत्याची भूमिका निभावली होती. हे धरण त्या काळातील आशिया खंडातील सर्वात मोठे धरण होते. याशिवाय भद्रावती आयर्न अँड स्टील्स वर्क, म्हैसूर सॅंडल ऑईल अँड सोप फॅक्ट्ररी, म्हैसूर विशवविद्यालय, बँक ऑफ म्हैसूर निर्माण केल्या आहेत. विश्वेश्वरय्या यांनी पाणी थांबविण्यासाठी ऑटोमॅटिक फ्लडगेटचे डिजाईन तयार केले होते. हे डिझाईन १९०३ मध्ये पुण्यातील खडकवासला धरणारात पहिल्यांदा वापरले गेले.

दरम्यान, १९५५ साली डॉ.एम. विश्वेश्वरय्या भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)