भारतमाता पुन्हा ओवाळणार नाही! राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून मोदींवर निशाणा 

मुंबई – भाऊबीजच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आणखी एक व्यंगचित्र काढत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. २०१४ च्या निवडणुकीवेळी विविध आश्वासन देत भाजपचे सरकार सत्तेवर आले. पण २०१९ मध्ये तसे होणार नाही. भारतमाता पुन्हा मोदींना ओवाळणार नाही, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

काय आहे व्यंगचित्र 
भाऊबीज असे या व्यंगचित्राला शीर्षक दिले आहे. या व्यंगचित्रात ओवाळून घेण्यासाठी मोदी पाटावर बसले असून त्यांच्यासमोर भारतमाता दाखवली आहे. भारतमातेसमोर २०१४ मधील विविध आश्वासने आणि २०१८ मधील परिस्थितीचे विविध पोस्टर्स दाखवले आहेत. गेल्या वेळेस ओवाळले, पण आता यापुढे नाही ओवाळणार! असे भारतमाता म्हणत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/RajThackeray/status/1060712900564865024

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)